जामनेर (प्रतिनिधी) : देशात व राज्यात कोरोना विषाणूची लागण झाली असल्या कारणाने सर्वत्र टाळेबंदी व संचार बंदी लावण्यात आली आहे. अशातच अवैध धंदे करणाऱ्यानी संधीचा फायदा घेत व पोलीस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी व्यस्त असल्याने सर्वत्र बंद असताना शहरातील अवैद्य गावठी दारूचा सुळसुळाट वाढला असल्याचे भुसावळ रोड वरील कांग नदी पत्रात, खादगाव रोड बोदवड रोड या ठिकाणी गावठी दारू विक्री होत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
तालुक्यात काही ठिकाणी चोरून लपून अवैध पने गावठी दारू विकण्याचे प्रकार सुरूच आहे. अशातच जामनेर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अवैध दारू विकल्या जात होती त्या ठिकाणी जामनेर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सहकारी यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी धाड टाकून मुद्देमाल सह आरोपींना ताब्यात घेत आरोपींची शहरातून धिंड काढत पोलिस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले. यावेळी जामनेर पोलिस स्टेशन चे पी आय. प्रताप इंगळे व त्यांचे सहकारी यांनी ही कारवाई केली आहे.