अवैध दारू विके्रत्यास न्यायालयीन कोठडी

0

जळगाव। राष्ट्रीय महामार्गावर नशिराबादजवळ हॉटेल रसोईच्या मागे अवैध दारू विक्री करणार्‍याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. त्याला शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नशिराबादजवळ असलेल्या हॉटेल रसोईच्या मागच्या बाजुला गुणवंत प्रल्हाद कोल्हे (वय 25, रा. आसोदा) हा 21 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास अवैध दारू विक्री करीत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. तर त्याचा साथीदार राहूल सुरेश धांडे हा पसार झाला होता. पोलिसांनी गुणवंत कोल्हे याला शनिवारी न्यायाधीश पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले.