जळगाव – शहरातील बसस्थानक परीसरात अवैधरित्या परवाना नसतांना देशीदारूची विक्री करणाऱ्या व्यक्तीस अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील 12 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आले असून याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की, आरोपी रवी राजू जाधव (वय-28) रा.खेडी बु|| ता.जि.जळगाव हा नविन बसस्थानक परीसरात टॅन्गो देशी दारूची विक्री करत असल्याचे दिसून आल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळून आल्याने त्यांनी तातडीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांच्या ताब्यातील दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आले असून त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भोई करीत आहे.