अवैध धंदे बंद न झाल्यास अमळनेर शहर बेमुदत बंद करण्याचा इशारा

0

अमळनेर : शहरातील अवैध धंद्ये आणि पोलीस अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे अमळनेरची कायदा-सुव्यवस्था धोक्यात येऊन गुन्हेगारी वाढीस कारणीभूत ठरली असल्याचे निवेदन बुधवार 14 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांना सर्वपक्षीय देण्यात आले. गेल्या वर्षभरात अमळनेर शहर व तालुक्यात पोलीस अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे शहराची कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गुन्हेगारी मोट्या प्रमाणावर उघडरित्या वाढीस लागून अमळनेर शहराचे जनजीवन उध्वस्त होऊन भीतीदायक दहशतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. व संघटीत गुन्हेगारी वाढीस लावली आहे. असे आरोप प्रसिद्धी पत्रकात म्हटले असून या बाबत 20 डिसेंबर रोजी अमळनेर बंदचे आवाहन केले आहे. सदर निवेदनात नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या प्रकाराबाबत निवेदनाद्वारे नमूद केले आहे.

राजकीय दबावापोटी पोलीस अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शहरात दिवसा सुद्धा बियर बार, अंडापावच्या लोटगाड्यांवर दारूविक्री, दारूची दुकाने, बनावट दारूविक्री, जागोजागी सट्टापिढी, जुगाराचे क्लब, सावकारी धंदे, रेती माफिया, रेशन माफिया निर्माण करून त्यांच्यावर राजकीय दबावापोटी पोलीस अधिकारी दुर्लक्ष करून अमळनेर शहरात भयानक व चिंताजनक दहशतीची भीती जनमाणसात निर्माण केली जात आहे. 5 डिसेंबर 2016 रोजी सुभाष चौकात झालेल्या निर्घृण हत्ते बाबत तसेच शहरात वावरणार्‍या वाहनांबाबत व पोलीस प्रशासनाने या सर्व बाबींची दखल न घेतल्यामुळे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यासह संबंधित दोषी पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध चौकशी व निलंबन आदींवर कारवाई व्हावी. सात दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास सर्व पक्षीय पदाधिकार्‍यांना तर्फे प्रथम अशा अवैध धंद्यावाल्याच्या दुकानांना सामूहिक भेटी देऊन अवैध धंदे मुक्तीसाठी गुलाबपुष्प देऊन बंदीची मागणी करणेत येईल. आणि तदनंतर देखील पोलिसांसह प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन शहराची कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणून अवैध धंदे बंद न केल्यास 20 डिसेंबर 2016 रोजी अमळनेर शहर व तालुका बेमुदत बंद करण्याचा निर्णय जनहितास्तव करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

सर्वपक्षिय सदस्यांची उपस्थिती
सदर निवेदनावर माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ.बी.एस.पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील, अनिल पाटील, विनोद पाटील, गोकुळ बोरसे, विक्रांत पाटील, प्रताप शिंपी, मनोज पाटील, पराग पाटील, सुलोचना वाघ, रामभाऊ संदानशिव, हाजी शेखा मिस्तरी, मुख्तार खाटीक, शांताराम ठाकूर, सचिन पाटील, अनंता निकम, श्याम पाटील, नवनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, योजना पाटील, रिता बाविस्कर, माधुरी पाटील, संजय मराठे, निशांत अग्रवाल, राजेश पाटील, नरेंद्र संदानशिव, प्रा.रामकृष्ण पाटील, सुरेश पाटील आदि उपस्थित होते.