जळगाव । जळगाव- अवैधरित्या प्रवासी वाहतुक करीत असलेल्या 25 रिक्षाचालकांवर शहर वाहतुक शाखेतर्फे कारवाई करण्यात येवून रिक्षा कार्यालयात जमा करण्यात आल्या आहेत. तर या रिक्षांच्या मालकांना दंडासाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शहर वाहतुक शाखेतर्फे रविवारी शहरात कारवाईची धडक मोहिम राबविण्यात आली.
त्यात अवैध प्रवासी वाहतुक करीत असतांना वाहतुक पोलिसांना पांडे डेअरी चौक, बेंडाळे चौक, ईच्छादेवी चौक, शिरसोली रोड, डिमार्ट परिसरात 25 रिक्षा आढळुन आल्या. या रिक्षाचालकांवर कारवाई करत रिक्षा कार्यालयात जमा करण्यात आल्या. तसेच ज्या चालकांनी कागपत्र दाखवून दंड भरले. त्यांना सोडून देण्यात आले तर इतर रिक्षाचालकांना न्यायालयात हजर करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाई ही शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक फौजदार गुलाब मनोरे, प्रकाश परदेशी, रविंद्र भावसार, मुक्तार अली, नरेंद्र बागुले, राजु मोरे आदी कर्मचारी केली आहे. दरम्यान, शहरात भंगार रिक्षातून देखील प्रवासी वाहतुक केली जातात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.