मुक्ताईनगर- सरस्वती कन्सट्रक्शन कंपनी कुठलाही शासकीय कर न भरता अवैधरीत्या वाळूसाठा करीत असल्याची तक्रार शिवसेनेतर्फे करण्यात आली तसेच अनेकवेळा तहसीलदारांना निवेदन देवूनही व तक्रार करूनही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व शिवसैनिकांच्या वतीने मुक्ताईनगर तहसीलदारांच्या दालनाबाहेर निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने अधिकारी, कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली.
कारवाईचे लेखी आश्वासन
तहसीलदार हे बोदवड येथे निवडणूक कामानिमित्त गेल्याने निवडणूक नायब तहसीलदार झांबरे यांनी कारवाई करण्याचे लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, छोटू भोई, राजेंद्र हिवराळे, अफसर खान, गणेश टोंगे, सचिन पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रवीण चौधरी, नासीर, जहीर भाई, पप्पू मराठे, अमोल पालवे, भोला तेजी, मनोज मराठे, भैय्या श्रीखंडे, पवन सोनवणे, पंकज राणे, अवी अडकमोल, शुभम शर्मा, शे.अफसर शे.अकबर व शिवसैनिक उपस्थित होते.