अवैध वाळू वाहतुकीचा डंपर पोलिसांनी केला जप्त

Illegal transport of sand in Bhusawal: Dumper caught by market police भुसावळ : शहरातील सुंदर नगर भागात अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्‍या डंपरवर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत डंपरसह चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

साकेगावच्या डंपर चालकाविरोधात गुन्हा
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल अतुल श्रावण कुमावत (पोलिस वसाहत, भुसावळ) हे रविवार, 4 रोजी पहाटे चार वाजता गस्तीवर असताना वाळू वाहतूक करणारे डंपर दिसल्याने त्यांनी ते अडवत चालकाला वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली असता चालकाकडे परवाना आढळला नाही शिवाय वाहनात दोन ब्रास वाळू आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी कुमावत यांच्या फिर्यादीवरून चालक गजानन पंडित जावरे (साकेगाव, ता.भुसावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. तपास नाईक निलेश चौधरी करीत आहेत.