अवैध वाळू वाहतूकदारांना पाच लाखांचा दंड : कुरंगीत चार ट्रॅक्टर जप्त

0

पाचोरा- तालुक्यातील कुरंगी येथील गिरणा नदी पात्रात अवैधरीत्या वाळू होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पोलिस उपअधीक्षक केशव पातोंड यांना सोबत घेऊन कारवाईत करीत वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर जप्त केले. त्यांच्यावर पाच लाख रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅक्टर मालकांनी दंड न भरल्यास त्यांच्या मालमत्तेवर बोजा बसवून मालमत्तेचा लिलाव करून दंड वसूल करण्यात येणार आहे. नायब तहसीलदार अमित भोईटे, तलाठी बंडू आगलावे, कैलास बहिर, संदीप चव्हाण, कैलास बांगर, गणेश गायकवाड, नकुल काळकर, गोपाल लांजेवार, राहुल कराड, अविनाश लांडे यांचा समावेश होता.