अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त : दोघांविरोधात गुन्हा

जळगाव : गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात जळगाव तालुका पोलिसांना यश आले आहे. ट्रॅक्टर चालकासह मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलिसांची कारवाई
जळगाव तालुक्यातील फुपनगरी शिवारातील गिरणा नदीपात्राजवळील स्मशानभूमीजवळील कच्च्या रस्त्यावरुन अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडले. चालकाकडेे कुठलाही परवाना आढळून आला शिवाय पोलिसांना पाहताच चालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात जमा केले असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी दीपक साहेबराव कोळी यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुशील पाटील करीत आहे.