पाचोरा : शहरात व तालुक्यात सर्रास अवैध व्यवसाय सुरु असल्याने शुल्लक कारणावरुन गँगवारचे वातावरण सुरु असून पोलिसांनी वेळीच लक्ष न दिल्यास पुन्हा जातीय वादाला खतपाणी देण्यचे काम होत असल्याचे वातावरण सुरु आहे. शहरात मागील काही दिवसांपासून सतत किरकोळ कारणांवरुन वाद निर्माण होवून त्याचे जातीय वादाला खतपाणी मिळत आहे. कॉलेज चौकात डुक्कराचे पिल्ले का पकडले, असे बोलण्यास गेलेल्या युवकावर भरचौकात चाकु हल्ला झाला. यात दिलीप पंडित शिंदे (28) हा युवक खजमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. याबाबतची फिर्याद त्याने दिल्याने आरोपी राजू गुंजाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि.15 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली होती. त्याच बरोबर इतरही काही भागात एकमेकांविरुद्ध जोरदार धुमचक्री होत असतांना जखमी झाल्यावर पो.स्टे.ला केवळ एन.सी.प्रकार दाखल होत असल्याने कागदावर गुन्हे कमी करण्याच्या खादीचा खटाटोप येण्यार्या गँगवार हा निमंत्रण देत असल्याचे बोलले जात आहे.