पुणे । महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांची रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या राज्यस्तरिय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. मंडळाचे सचिव संतोष पु. खामकर यांच्या वतीने जाधव यांना पत्र देण्यात आले. जाधव 20 वर्षांपासून लावणी कलावंतांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करीत आहेत. निवडीनंतरजाधव यांचे मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे, सांस्कृतिक मंत्र्यांचे सल्लागार मिलिंद लेले यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या.