मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास १ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. काल मुंबईत प्रियांका आणि निकचे दुसरे रिसेप्शनचे पार पडले. या रिसेप्शनसाठी प्रियांकासाचा खास लेहंगा सब्यासाचीने तयार केला होता. तिच्या या लूकसाठी सब्यासाचीने कशाप्रकारे मेहनत घेतली त्याचा व्हिडिओ सब्यासाचीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
प्रियांकाच्या या खास रिसेप्शन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले गेले. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती.