शिरपूर । येथील आर.सी.पटेल शैक्षणिक संकुलात सोमवार दि.18 डिसेंबर रोजी संस्थेच्या हेमंतबेन (मम्मीजी) रसिकलाल पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक विभागातर्फे मम्मीजी क्रीडा महोत्सव सलग तिसर्या वर्षी संस्थेच्या मध्यवर्ती इमारतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन संस्थेच्या असली येथील आर.सी.पटेल आश्रमशाळेने जनरल चॅम्पियनशीप विजेतेपदाचा व वाघाडी येथील येथील आर.सी.पटेल आश्रमशाळेने जनरल चॅम्पियनशीप उपविजेतेपदाचा मान पटकावला. शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यशस्वी खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी शिरपूर पिपल्स बँकेचे माजी व्हाईस चेअरमन कमलकिशोर भंडारी, गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे, तालुका क्रीडा अधिकारी बी.आर.बोथिकर, एच.आर.पटेल महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या शारदा शितोळे, प्रा. डॉ. विनय पवार, प्राचार्य पी.व्ही.पाटील, प्राचार्य सौ. एम.एस.अग्रवाल, प्राचार्य सिद्धार्थ पवार, प्राचार्य विजय सुतार, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आर.एन.पवार, बी.बी.सोनवणे, भटू माळी, पी.डी.कुलकर्णी, आर.टी.भोई, रितेश कुलकर्णी, गोपाल पाटील, मनोज पाटील, मुख्याध्यापिका ज्युली थॉमस, एलिझाबेथ, स्मिता पंचभाई, रिबेका नेल्सन, जपश्री मुखर्जी, क्रांती जाधव, रेखा सुर्यवंशी, मुख्याध्यापक सी.डी.पाटील, गणेश साळुंखे, बी.आर.महाजन, प्रदिप गहिवरे, महेंद्रसिंग परदेशी, सैयद इफतेखार, आर.बी.खोंडे, ईश्वर पाटील, सर्व मुख्याध्यापक, प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक, रविंद्र खुटे, भटू पाटील, अमित परदेशी, ललित सोनार, नितीन राजपूत, मनोज पाटील, पी.बी.धायबर, आर.यू.चौधरी, दुष्यंत पाटील, के.पी.पाटील, मनिषा पाटील, भूषण चव्हाण, राकेश बोरसे, फिरोज शेख आदी उपस्थित होते.