शिरपूर । शिरपूर तालुक्यातील असली येथील 10 वर्षे वयाच्या धनश्री जाधव या मुलीची ओपन हार्ट सर्जरी पटेल परिवारासह उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने पूर्णपणे मोफत करण्यात आली. माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, आमदार कार्यालयातील रुग्णमित्र दिलीप माळी (सोनगीर), असली येथील उपसरपंच राजेंद्र वंजारी यांनी धनश्री जाधव हिला वैद्यकिय सहाय्य मिळण्यासाठी अथक प्रयत्न केले.
सदिच्छा भेट
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत ही शस्त्रक्रिया मोफत झाली. 2 लाख पेक्षा जास्त रकमेची मोफत शस्त्रक्रिया झाल्याने गरजू व गरीब पालकांना दिलासा मिळाला असून त्यांनी पटेल परिवाराने तातडीने प्रयत्न केल्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले आहेत. धनश्री जाधव हिच्या आई वडीलांनी जनक व्हीला, आमदार कार्यालयात उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांची सदिच्छा भेट घेतली.
यांनी केले प्रयत्न
यावेळी कृतिकाबेन भुपेशभाई पटेल, प्रमिलाबाई जाधव, प्रितेश पटेल, स्वीय सहाय्यक अशोक कलाल, रुग्णमित्र दिलीप माळी (सोनगीर) हे देखील उपस्थित होते. शिरपूर शहर व तालुक्यातील असंख्य रुग्णांना रुग्णसेवा देण्याचे काम आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने अखंडपणे सुरु असून अनेक गरजू रुग्णांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे.
उपचारासाठी प्रयत्न
शिरपूर तालुक्यातील असली येथील धनश्री गरीबदास जाधव ही मुलगी अतिशय गरीब परिस्थितीत असल्याने तिच्यावर उपचार होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. धनश्री जाधव हिचे वडील गरीबदास सुकदेव जाधव व आई प्रमिला गरीबदास जाधव यांना मुलीच्या शस्त्रक्रियेसाठी 2 लाखापेक्षा जास्त खर्च येणार होता. एस.एम.बी.टी. हॉस्पीटल, धामणगाव, घोटी इगतपुरी येथे चेन्नई येथील डॉक्टर्सची टीम व डॉ. यशवंतकुमार सिन्हा व डॉ. गौरव वर्मा, सहाय्यक डॉक्टर्स यांनी धनश्री जाधव हिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.