असलोद :शहादा तालुक्यातील असलोद येथील बी.एस.पी फाँऊडेशनच्या स्वयम सेवकांची आमदार राजेश पाडवी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी गावातील परिस्थिती जाणून घेतली. यावेळी माजी जि.परिषद सदस्य सुनिल चव्हाण देखील उपस्थित होते. खेतीया मध्य प्रदेश राज्याच्या सिमा पाहणीसाठी ते आले होते. गावात बी.एस.पी. फाऊंडेशनने ठेवलेल्या चोख बंदोबस्ताचे आमदार पाडवी यांनी कौतुक केले.