असलोद बसस्थानक ते दुधखेडा फरशी पुलापर्यंत रस्त्याची दुरावस्था

0

असलोद । असलोद बस स्टँड पासुन ते दुधखेडा रस्त्यावरील फरशी पर्यंत 2 ते 3 किलोमिटर अतरांचा स्त्याची अत्यंत दयनिय दुरावस्था झाली आहे. त्या रस्त्यावरूण येणार्‍या जाणा र्‍या वाहनांना मोठ प्रमाणात कसरत करावी लागत आहे. असलोद परिसरातील दुधखेडा, मानमोडा, भुलाने, लंगडी, मलगाव, घोटाळी या गावातील नागरीक रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी करीत आहेत. असलोद बस स्टॉप पासुन ते दुधखेडा फरशीपर्यंत बांधकाम विभागमार्फत डांबरीकरण रस्ता करण्यात आला होता. त्या रस्त्यास बरेच वर्ष झाल्याने रस्त्याची पुर्ण दुरावस्था झाली आहे.

रस्त्या खड्डयात कि खड्डयात रस्ता अशी परिस्थिती झाली आहे. हा 3 किलामिटर रस्ता असलोद गावाला लागुन आहे. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. असलोद गावाच्या गावविहीरी जवळ रस्ता सोडुन रस्त्याच्या बाजुने वाहनांचा वापर सुरू आहे. गावतील गटारीचे पाणी नेहमी या ठीकाणी येत असल्याने ते पाणी रस्त्यातच नेहमी साचत असते. त्यामुळे लहान वाहनांना व मोटरसायकल वाल्यांना रस्त्याने न जा ता रस्त्याच्या साईडपट्टीवरून जा वे लागत आहे.

या रस्त्याची दरवर्षी पावसाळा सरू होण्या अगोदर डागडूजी करून दुरूस्ती केली जाते. परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी वाहनांचा वापरामुळे रहदारी जास्त आसल्याने रस्त्याची दुरावस्ता होत असते. त्यामुळे दरवर्षी नेहमी येणार्‍या जाणार्‍या सर्व नागरीकांना पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणात त्रास भोगावे लागत आहे. हा रस्ता असलोद गावाला लागुन असल्याने या रस्त्याने महीला वर्ग नेहमी नाल्याकाठी शौचालयास जातात त्यांना देखील नेहमी रस्त्याची येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यात दुरावस्ता होत असल्याने या 3 किलोमिटर अंतरावर मोठ्या प्रमाणात नागरीकांना व वाहक चालकांना कसरत करूण रस्त्याने जावे लागते. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याची दुरूस्ती असलोद ग्रामपंचायतीने अथवा बांधकाम विभागाने करावी, अशी अपेक्षा सर्व परिसरातील नागरीक करीत आहेत. या रस्त्याची दरवर्षी डागडूजी करून पैसेवाया घालण्यापेक्षा पुर्ण 3 किलोमिटर रस्ता पक्का काँक्रिटीकरणाचा किंवा उत्तम प्रतिचे डांबरीक रणाचा रस्ता करण्याचाी गरज असल्याचे नागरीकांचे म्हणने आहे.