असलोद । शहादा तालुक्यातील असलोद येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या नागेंश्वर महाराज यांची दरवर्षी यात्रा भरते. येत्या 23 नोव्हेंबर रोजी नागपंचमील यात्रा भरणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरु आहे. असलोद येथील ग्रामस्थ तयारीला लागले आहे. नागेंश्वर मिंत्र मंडळ यांच्या वतीने मंदीराच्या सर्व परीसरात साफसफ ाई करण्यात येत आहे. यात्रेच्या दिवशी गावकर्यांच्या मनोरंजानासाठी तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
असलोद परिसरात ही यात्रा एकमेव असते त्यामुळे भाविकांची गर्दी मोठी असते. असलोद ग्रामपंचायतच्या वतीने यात्रेच्या जागेचे नियोजन करण्यात आले आहे. बसस्थानकापासुन ते नागेंश्वर मंदीरा पर्यत पुर्ण जागा यात्रेसाठी तयार करण्यात आलेली आहे. भाविकांनी लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.