असा असेल राष्ट्रवादीचा हल्लाबोल मोर्चाचा कार्यक्रम!

0

मुंबई :– भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढला जाणारा हल्लाबोल मोर्चाचा दुसरा टप्पा 16 जानेवारी पासून सुरू झाला.

या दुसऱ्या टप्प्याचा नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

दिनांक १७ जानेवारीला सकाळी ११ वाजता भूम, दुपारी ४ वाजता पाटोदा,सायंकाळी ७ वाजता बीड, १८ जानेवारीला सकाळी ११ वाजता गेवराई, दुपारी ३ वाजता माजलगाव, सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई, १९ जानेवारीला सकाळी ११ वाजता औसा, दुपारी ४ वाजता उदगीर, सायंकाळी ७ वाजता अहमदपूर, २० जानेवारीला सकाळी ११ वाजता लोहा, दुपारी ३ वाजता गंगाखेड, सायंकाळी ७ वाजता परळी, २१ जानेवारीला दुपारी १ वाजता उमरी, सायंकाळी ५ वाजता माहुर, २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता हिंगोली, दुपारी ४ वाजता वसमत, सायंकाळी ७ वाजता परभणी, २३ जानेवारीला सकाळी ११ वाजता पाथरी, दुपारी ४ वाजता सेलू, सायंकाळी ७ वाजता मंठा, २४ जानेवारीला सकाळी ११ वाजता जाफराबाद, दुपारी ३ वाजता घनसावंगी, सायंकाळी ७ वाजता बदनापूर, आणि शेवटची जाहीर सभा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ३ फेब्रुवारीला औरंगाबादला होणार आहे.