असे पूर्ण झाले साराचे स्वप्न

0

मुंबई : बॉलीवूडचा नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. आता लवकरच तीचा दुसरा चित्रपट ‘सिम्बा’ रणवीर सिंगसोबत येत आहे. ‘सिम्बा’ चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.

एका कार्यक्रमात, साराने रोहित शेट्टीविषयी काही गोष्टी सांगितले. जेव्हा साराला विचारण्यात आले, रोहित शेट्टीसोबत काम करण्यास तू का उत्सुक होती ? तेव्हा मी रोहित सरांची खूप मोठी चाहती आहे. मी त्यांना तीनवेळा मेसेज केला आणि त्यांनी तिसऱ्या मेसेजला मला रिप्लाय दिला. तेव्हा मी त्यांच्याकडे ‘सिम्बा’ चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. साराला चित्रपटात घेण्याआधी रोहित शेट्टीने ‘केदारनाथ’चे दिग्दर्शक अभिषेक कपूरशी संवाद साधला. अभिषेक यांनी साराला डोळे झाकून चित्रपटात भूमिका द्या, असे रोहितला सांगितले.