अस्वच्छतेचा ठपका पुसण्यासाठी सांघिक प्रयत्नांची गरज

0

जिल्हाधिकारी दुसर्‍या दिवशीही भुसावळात ; सयाजीरावांवर कारवाईचे आदेश

भुसावळ: जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी गुरुवारी भल्या सकाळीच पालिका गाठून दांडीबहाद्दरांची हजेरी घेत त्यांना फैलावर घेतले होते तर दुसर्‍या दिवशीही शुक्रवारी येण्याचे सांगितल्यानंतर त्यांनी सकाळी नऊ वाजताच भुसावळ गाठल्याने कर्मचार्‍यांची भंबेरी उडाली. शासकीय सुटी असलीतरी पालिकेतील अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी येणार असल्याने जातीने हजर राहिले. राजे यांनी पालिकेतील स्वच्छता कर्मचार्‍यांसह अन्य विभागांच्या कर्मचार्‍यांशी संवाद साधून त्यांची अडी-अडचणी जाणून घेतल्या तर शहर स्वच्छतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक भवनासह गोपाळ नगरातील कॉम्प्लेक्समध्ये पालिकेचे स्थलांतर होत असल्याने पुन्हा त्यांनी मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांच्या सोबत भेट देत पाहणी केली. गुरुवारी उशीरा येणार्‍या, दांडी मारणार्‍या व अ‍ॅडव्हान्स स्वाक्षरी करणार्‍या 25 कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी मुख्याधिकार्‍यांना दिल्या.