मूत्रमार्गाला जीवाणू आणि बुरशीजन्य रोगांचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असून ते पुरूषांपेक्षा महिलांमध्ये जास्त आढळून आले आहे. घट्ट जीन्स आणि घट्ट कपडे घातल्यामुळे जंतूसंसर्ग होण्याची संभाव्यता वाढते, असे वैद्यकीय शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. डॉक्टर म्हणतात की प्रत्येक पाच जणींपैकी एक महिला जंतूसंसर्गाची बळी ठरते. अगदी जन्मापासून हा धोका असतो.
महिलांनाच धोका अधिक का….
तज्ज्ञ जसवंत पाटील म्हणतात, स्त्रियांमध्ये मूत्रमार्ग कमी लांबीचा असतो आणि गुदद्वाराजवळ असतो त्यामुळे जंतूसंसर्गाची शक्यता जास्त असते. स्वीमिंग पूलही या संसर्गास कारणीभूत ठरतो. स्त्रीरोग तज्ज्ञ प्रिती व्यास स्त्रियांमधील एस्ट्रोजेन हा हार्मोन वय वाढल्यावर कमी होतो. त्यामुळे जंतूंना विरोध करणारी शरीरांतर्गत व्यवस्था दुर्बल बनते. परीणामी मेनोपॉझ झाल्यानंतर संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. स्त्रीरोग तज्ज्ञ रंजना दास यांनी कॉलेजमधील मुलींची जंतूसंसर्गाची तक्रार असते याकडे लक्ष वेधले. या मुली घट्ट जीन्स घालतात त्यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळत नाही. मूत्रमार्गात बॅक्टेरीया वाढायला ही स्थिती कारणीभूत ठरते.
संसर्ग टाळण्यासाठी काय कराल…
1. लघवी तुंबवून ठेऊ नका. सार्वजनिक स्वच्छतालये घाणेरडी असतात हे मान्य पण अशा वेळी त्याचा वापर करा
2. नायलॉनची अंतर्वस्त्रे टाळा.
3. तहान नसली तरी पाणी प्या.
4. फळे, भाज्या, शेंगा खा.