अस्वलाच्या हल्ल्यातील मयतांच्या वारसास धनादेश वाटप

0

तळोदा। ता लुक्यातील मोठीबारी येथील अस्वलाच्या हल्यात मयत झालेल्या महिला टीमक्या नाईक व अलवान येथील अस्वलाच्या हल्यात जखमी झालेल्या मोग्या पवार या दोघांच्या वारसास वन्य प्राणी जीवित हानीतून आमदार उदेसिंग पाडवी यांच्याहस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. 30 डिसेंबर 2017 रोजी अस्वलाने अलवान परिसरात धुमाकूळ घातला होता, त्यात तळोदा तालुक्यातील मोठीबारी येथील रहवासी सायंकाळच्या सुमारास शेतातुन पायवाटेने जात असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला चढविला होता. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला होता.

मयतच्या वारसास 8 लाख तर जखमीस 1 लाखाची मदत : या हल्यात 55 वर्षीय टिमकी खाअल्या नाईक, हे गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला होता, तर अलवान परिसरात मोग्या रामा पवार हा शेतातील कामे आटोपून घरी परतत असताना अस्वलाने त्यावर हल्ला चढविला होता. याबाबत वनक्षेत्रपाल अशोक वाघ यांनी या घटनेचा शासन दफ्तरी पाठपुरावा करून शासानाच्या वन प्राणी जीवित हानी योजनेतुन मयत टिमकी नाईक व गंभीररित्या जखमी मोग्या पवार या दोघांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे. यात मयत झालेल्या टिमका नाईक यांच्या वारसास 8 लाख तर गंभीररित्या जखमी असलेल्या मोग्या पवार यास 1 लाखाची आर्थिक मदत वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. आमदार उदेसिंग पाडवी यांच्याहस्ते मोग्या पवार यास 1 लाखाच्या धनादेश तर मयत टिमका नाईक यांच्या वारसास 8 लाखा पैकी 1 लाखाचा धनादेश देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
7 लाख शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे वारसदार यांचे नांवे राष्ट्रीयकृत बँकेत संयुक्त खात्यात ठेव रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष श्याम राजपूत, अजय परदेशी, संजय चौधरी, डॉ. स्वप्नील बैसाने, शिरीष माळी, उपवनसंरक्षक पी. एन. पिंगळे, सहाय्यक वनसंरक्षक एस. ए. आहिरे, तळोदा वनक्षेत्रपाल अशोक पाटील, वनपाल एस.बी.चव्हाण, खर्डी वनरक्षक एस. एल. वाघ, वनपाल ए.जी.वाडीले, वनरक्षक बी.एस.जाधव, जे.आर.खोपे आदी उपस्थित होते.