अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी

0

तळोदा । तळोदा तालुक्यातील प्रतापपुर येथील शेतकरी छोटू रामसिंग राजपूत यांच्या गावालगत केळीच्या शेतात रखवालदार उर्फ बाबा वय 65 वर्षे हा केळीला पाणी घालत असतांना बटेसिंग अजबसिंग राजपूत याच्या शेताचा तार कंपाऊंड मधून निघून अस्वलाने हल्ला चढविला. अस्वलाच्या हल्ल्यात रखवालदारच्या तोंडावर लचके तोडले असून गंभीर जखमीला प्रतापपुर प्रा. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी कांतीलाल पावरा यांनी प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.