अहमदनगर : अहमदनगरमध्ये गर्भवती महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. श्रावणी निकम असे या मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. अहमदनगर महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात श्रावणी निकम ही गर्भवती महिला दाखल झाली होती. मात्र आज तिचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच रुग्णालयाच्या परिसरात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी रुग्णालयात बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच संबंधित डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.