अहमदनगर स्फोटाचा निषेधही नाही!

0

धार्मिक रंग नसल्याने संघटना पुढे आल्या नाहीत : संजय नहार

अहमदनगर : नगर येथे कुरिअर पार्सल स्फोटात जखमी झालेल्यांची आनंदऋषीजी रुग्णालयात सोमवारी सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार तसेच मानवी हक्क क्षेत्रात काम करणारे वकील असीम सरोदे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी जखमींना मदतीचे आश्वासन दिले. या घटनेला धार्मिक रंग आला नसल्याने कदाचित कोणतीही संघटना साधा निषेध करण्यासाठी पुढे आली नसावी, असे मत नहार यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी!
पत्रकारांशी बोलताना संजय नहार म्हणाले की, स्फोटात जखमी झालेल्या युवकाच्या जागी मी मला पहात होतो. आजूबाजूला माझे कुटुंबीय उभे आहेत असा मला भास झाला. ही घटना सामाजिक दहशतीची नाही, तर व्यक्तिगत दहशत बसविण्याचा प्रकार वाटतो. या घटनेला धार्मिक रंग आला नसल्याने कदाचित कोणतीही संघटना निषेध करण्यासाठी पुढे आली नसावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कुरिअर बॉम्ब स्फोटप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन बारकाईने चौकशी करावी, अशी मागणी अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केली.