भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अहमदाबाद ते प्रयागराज दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डाऊन विशेष अहमदाबाद-प्रयागराज विशेष एक्स्प्रेस
डाऊन 09267 विशेष अहमदाबाद-प्रयागराज विशेष एक्स्प्रेस 25 मार्चपासून
पुढील आदेशापर्यंत दर गुरुवारी दुपारी 4.35 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 4.50 वाजता प्रयागराजला पोहोचेल. अप 09268 अप प्रयागराज-अहमदाबाद विशेष गाडी 26 मार्चपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी सात वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 7 वाजता अहमदाबादला पोहोचेल.
या गाडीला नंदियाद, आनंद, वरोदरा, भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरीया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, तीन वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 10 शयनयान आणि 5 द्वितीय श्रेणी आसन बोगी जोडण्यात येतील. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.