रावेर- तालुक्यातील अहिरवाडी येथील इसमाचा इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवार, 20 रोजी सकाळी नऊ वाजेपूर्वी अहिरवाडी गावात घडली. सुनील सुरेश वाघ (35) असे मयत इसमाचे नाव आहे. राहत्या घरी त्यांना विद्युत शॉक लागल्याने बेशुद्धावस्थेत रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी तपासणी केली असता वाघ यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषीत केले. डॉ.बारेला यांनी रावेर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार श्रीराम वानखेडे करीत आहेत.