अहिरवाडीच्या युवतीची आत्महत्या

0

रावेर- तालुक्यातील अहिरवाडी येथील 18 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पूजा भागवत चौधरी (18) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास घरात कुणी नसताना या तरुणीने घराच्या स्लॅपमधील हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयताचे काका सुनील गबा चौधरी यांनी रावेर पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास श्रीराम वानखेडे करीत आहेत.