रावेर : तालुक्यातील अहिरवाडी शेत शिवारात बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान याच बिबट्याने एका कुत्र्याची शिकार करून फस्त केल्याचे समोर आले आहे. वनविभागाला याबाबत कळविण्यात आले आहे.
शेतमजुरांना घडले बिबट्याचे दर्शन
तालुक्यातील अहिरवाडी शेत शिवारात गौरव चौधरी यांच्या शेतात काही मजूर काम करत असतांना शनिवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास बिबट्या दिसल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे तर परीसरातील ग्रामस्थांमध्ये धडकी भरली आहे. काही अंतरावर याच बिबट्याने कुत्र्याची शिकार करून फस्त केल्याचे दिसून आले. या संदर्भात ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती कळविली असून वनपाल अतुल तायडे यांच्यासह पथक घटनास्थळी रवाना झाले. पगमार्ग घेतला असता तो बिबट असल्याचे सांगण्यात आले तसेच नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. शक्य झाल्यास जवळ फटाके ठेवा, असे अवाहन त्यांनी जनतेला केले आहे.