अहिरवाडी हादरले : चाकूच्या धाकावर सव्वादोन लाखांची लूट

0

रावेर- तालुक्यातील अहिरवाडी येथे चाकूचा धाक दाखवून तब्बल दोन लाख 20 हजारांचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने गावात खळबळ उडालीआहे. अहिरवाडी येथील वत्सलाबाई रवींद्र चौधरी यांच्या घरात मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत चाकुचा धाक दाखवून अंगावरील दागिण्यांसह लोखंडी शोकेसचे लॉकर तोडून त्यातील 80 हजार रुपये किंमतीचा राणीहार, सात हजार 500 रुपये किंमतीची सोन्याची तर 15 हजार रुपये किंमतीचे कानातले, 12 हजार 500 रुपये किंमतीच्या बाळ्या तसेच मंगलपोतसह 80 हजारांची रोकड लांबवली. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली असून पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे व सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. रावेर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.