अहिर सुवर्णकार संघटनेतर्फे गुणवंतांचा सत्कार

0

अमळनेर। येथील अहिर सुवर्णकार संघटनेतर्फे सोनार समाजातील पहिली ते पदव्यूत्तर पर्यतच्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व सर्वाधिक गूणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव करण्यात आला. पारितोषिक सोहळ्याचे आयोजन 5 ऑगष्ट रोजी संत नरहरी महाराज जयंती निमित्त भागवत रोडवरील सूवर्णकार यूनियनच्या सभागृहात करण्यात आले आहे.

संत नरहरी महाराज जयंती निमित्त वाडी मंदिरापासून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सत्कार सोहळा व पारितोषिक वितरण करण्यात येईल. नगराध्यक्षा पूष्पलता पाटील व उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, माजी आमदार साहेबराव पाटील यांचा सत्कार सोहळा आयोजीत केला असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुंबई महानगरपालिकेचे माजी सहाय्यक आयूक्त प्रभाकर मोरे रहाणार आहे. डी.जी.रणधिर, सूनिल आहिरराव, देवेंद्र सोनार आदी उपस्थित राहाणार आहेत. सोनार समाजातील पहिली ते पदव्यूत्तर परिक्षेत 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले असतील अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकाची छायांकित प्रत 31 जुलै पर्यंत मोहन भामरे, राजेंद्र पोतदार, निलेश देवपूरकर, गोपाल दाभाड, सूनिल वडनेरे यांच्याकडे जमा करावी. उपस्थितीचे आवाहन अहिर सुवर्णकार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.