सांगवी : येथील अहिल्यादेवी सेवा संघाची वार्षिक सर्वसाधारण बैठक नुकतीच पार पडली असून बाबासाहेब चितळकर यांची संघाच्या अध्यक्षपदी तर मनोजकुमार मारकड यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. पिंपळे गुरव येथील निळु फुले नाट्यगृहात पार पडलेल्या या बैठकीस नगरसेविका आशा शेंडगे, श्रीगणेश बँकेचे अध्यक्ष तथा संघाचे सदस्य सूर्यकांत गोफणे, विजय वाघमोडे, माजी अध्यक्ष अभिमन्यु गाडेकर आदींसह संघाचे सर्व सभासद उपस्थित होते. नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी सुधाकर सुर्यवंशी व सचिन सरक, सचिवपदी डॉ. दिनेश गाडेकर, सहसचिवपदी डॉ. अतुल होळकर व नारायण मदने, खजिनदानपदी विठ्ठल वाघदरे, सहखजिनदारपदी अभिमन्यू गाडेकर आदींची निवड करण्यात आली. सदस्यपदी दादासाहेब देवकाते, मारूती काळे, अशोक काळे, सुनील पांढरे, संपत भिटे, संतोष काशिद, रामेश्वर हराळे, संतोष मदने, संभाजी गोफणे, सुरज गोटके, विवेक लबडे, वैजनाथ सामसे, योगेश तरंगे, निलेश गाडेकर आदींचा समावेश आहे.