धुळे। इंदूरहून निघालेली व सोनी (सांगली) येथे जाणारी 900 कि.मी ची अहिल्या प्रेरणा ज्योती पदयात्रा शनिवारी सकाळी धुळ्यात पोहचली. म. गांधी पुतळ्याजवळ यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही यात्रा सरदार पटेल उद्यानात पोहचली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. दुपारी 2 वाजता धनगर समाज महासंघाचे संस्थापक तथा माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या उपस्थितीत धनगर समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
हजारो समाजबांधव उपस्थित
सोबत प्रदेशाध्यक्ष अॅड. आ. रामहरी रुपनर, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव राणोजे, अहिल्या महिला संघाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. अलका गोडे, जि. प. सभापती मधुकर गर्दे, महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वाघ, मल्हार सेनेचे अण्णा सूर्यवंशी उपस्थित होते. या वेळी मान्यवर पाहुण्यांचे धुळे शहर शाखेतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. मेळाव्यास हजारो समाज बांधवानी हजेरी लावली. अॅड. रामहरी रुपनर यांनी धनगर समाजाला एस.टी. आरक्षण मिळावे म्हणून विधानसभेत डागत मागणी लावून धरल्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी आप्पा बागले, लखन गोराड, नथ्थू बोरसे, वेडू शिंदे, बापू शेलार, अविनाश बोरसे, नगरसेवक आमोल मासुळे, सतीश सरग, गोविंद मदने, विनोद खेमनर, दीपक बागूल, भैय्या कोळपे, दीपक शेंडगे, राजू नेमाणे, बापू बागूल, सुभाष ठाकरे, किरण पेंढारकर, अनिल लांडगे, सुमन पाटील, डॉ. लीलावती राजवाडे, सुगंधा पेंढारकर आदी उपस्थित होते.
माजी मंत्री अण्णा डांगे यांचे स्वागत
अहिल्यादेवी होळकर जयंती आणि धनगर समाजाच्या मेळाव्यासह समाजात आदर्श निर्णय घेणार्या समाजबांधवांच्या सत्कार समारंभा साठी माजी मंत्री अण्णा डांगे हे धुळ्यात आले होते. गुलमोहोर या शासकीय विश्रामगृहात शहराचे आमदार अनिल गोटे, जि.प. समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे यांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना व धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील धनगर समाजाच्यावतीने शनिवारी दुपारी राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदीरात समाज मेळावा व सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी माजी मंत्री अण्णा डांगे तसेच महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष आ. रामहरी रूपनर, अहिल्या महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. अल्काताई गोरे, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे आदी उपस्थित होते.