अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन

0

मुंबई : जाहिरात क्षेत्रात मोठे नाव असलेले अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे आज दि. १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अॅलेक पदमसी यांनी अनेक जाहिराती केल्या आहेत. ‘सर्फ’, ‘चेरी ब्लॉसम’, ‘शू पॉलिस’, ‘एमआरएफ मसल मॅन’, ‘लिरील गर्ल’, ‘कामसूत्र कपल’, ‘हमारा बजाज’, ‘टीव्ही डिटेक्टिव्ह कमरमचंद’, ‘फेअर अँड लव्हली’ ‘हँडसम ब्रँड’ यासह अनेक जाहिराती त्यांनी केल्या आहेत. अॅलेक यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. जाहिरात क्षेत्रातील मोठे नाव काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेक मान्यवरांनी आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत.

अॅलेक पदमसी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरवरून दुःख व्यक्त केले आहे.