मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री अॅमी जॅक्सनने एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. अॅमी जॅक्सनने जॉर्ज पानायिटूसोबत साखरपुडा केला आहे. अॅमीने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटरवरून ही बातमी दिली आहे.
जॉर्ज ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा मुलगा आहे. त्याचबरोबर हिल्टॉन, डबल ट्री, पार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स जॉर्जच्या मालकीची आहेत. जॉर्जला एक भाऊ आणि तीन सावत्र बहिणी आहेत. अॅबिलीटी ग्रुपचा तो संस्थापक असून वयाच्या १६ वर्षी तो या ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. अॅमी अनेकदा जॉर्जसोबत आपले फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करते.