न्यू यॉर्क : बॉलीवूडची देशी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास डिसेंबर महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत. दोघांचीही बऱ्याच दिवसांपासून तयारी सुरू आहे. काहीच दिवसांपूर्वी न्युयॉर्क येथे प्रियांकाचे ब्रायडल शॉवरचे झाले. आता तिने बॅचलर पार्टी एन्जॉय कली आहे.
सोशल मीडियावर प्रियांकाच्या या बॅचलर पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. प्रियांकाने ही बॅचलर पार्टी अॅमस्टरडँम येथे आयोजित केली होती.
प्रियांकाचा लग्नसोहळा काहीच दिवसांवर येऊन पोहोचला आहे. त्यासाठी ती फार उत्साही आणि आनंदी असल्याचे पाहायला मिळतेय. तिचा लग्नसोहळा तिन दिवस चालणार आहे. राजस्थानमधील जोधपूर येथे निक आणि प्रियांका लग्नबेडीत अडकणार आहेत.