अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांचा न्यायालयात टिकटॉक अ‍ॅपची बाजू मांडण्यास नकार

0

नवी दिल्ली:भारत सरकारकडून चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अनेकांनी चिनी सामानांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात टिकटॉक अ‍ॅपची बाजू मांडण्यास नकार दिला आहे. चिनी अ‍ॅपची वकिली करणार नाही, असे रोहतगी यांनी स्पष्ट केले आहे.

“भारत सरकारने बंदी घातलेल्या चिनी अ‍ॅपच्या बाजूने मी खटला लढणार नाही”, असं म्हणत मुकुल रोहतगी यांनी टिकटॉकची बाजू कोर्टात मांडण्यास नकार दिला. “चिनी अ‍ॅपसाठी भारत सरकारविरोधात मी लढणार नाही”, असं रोहतगी म्हणाले. एका वृत्तसंसंस्थेने याबबात वृत्त दिले आहे.

चीनकडून याबाबत पहिली प्रतिक्रिया आली. “भारताने उचललेल्या पावलानंतर चिंतेत असून परिस्थितीची पडताळणी सुरू आहे” अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी दिली.