अ‍ॅड.अभय पाटील यांना अटक करण्याची मागणी

0

जळगाव। शिवसेनेकडून व महिला आघाडीच्या पदाधिकारीकडुन फेसबुकवर महिलांविषयी अश्लिल वक्तव्य व समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कॉग्रेस पाचोरा तालुकाध्यक्ष अ‍ॅड.अभय पाटील यांना त्वरीत अटक व्हावी, यासाठीचे निवेदन जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या अनुउपस्थित राहुल मुंडके व जिल्हा अधिक्षक दत्तात्रय कराडे यांना देण्यात आले.

ग्रामीण भागातील महिलांच्या स्वच्छ चरीत्रावर शिंतोडे उडविणार्‍या व अश्लिल वक्तव्य करून चरीत्र-हरण करणारे समाजकंटक अ‍ॅड.अभय पाटील हा बर्‍याच वर्षांपासुन फेसबुकवरती समाजात तेढ निर्माण होतील, असे विविध पोस्ट टाकत आहे अशा समाजकंटकावर अ‍ॅड.अभय पाटील याच्यावर कडक कायदेशीर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्वरीत अटक करण्याची मागणी केली आहे.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
यावेळी शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकात सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व चंद्रकांत पाटील, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, इंदिराताई पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरूण पाटील, तालुकाप्रमुख दिपकसिंग राजपुत, प्रा.गणेश पाटील, पप्पुदादा राजपुत सर्व शिवसेना व महिला संघटना पदाधिकारी आणि कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.