राजगुरुनगर । श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजगुरुनगर एसटी कामगार संघटनेच्या वतीने अॅड. सुरेश कौदरे यांचा सत्कार करण्यात आला. भीमाशंकर ट्रस्टच्या अध्यक्षपदाची खेड तालुक्याला प्रथमच संधी मिळाल्याबाबत तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे. अॅड. सुरेश कौदरे हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असतात. त्यामुळे हा सन्मान सर्वसामान्य जनतेचा आहे, असे यावेळी बोलताना कामगार संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व शिवसेना उपतालुकाप्रमुख दिलीप तापकीर म्हणाले.
सूचनांचा पाठपुरावा करणार!
सत्काराला उत्तर देताना अॅड. कौदरे म्हणाले, एसटी कर्मचार्यांच्या माध्यमातून देशातून आलेल्या भाविकांना भीमाशंकर येथे वाहतुकीची सुविधा पुरविली जाते. त्यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. तसेच कर्मचार्यांनीही केलेल्या सूचनांचा पाठपुरावा होईल, असेही ते म्हणाले. राजगुरुनगर बँकेचे अध्यक्ष किरण आहेर, कामगार संघटनेचे माजी सचिव संजय सुर्वे, एल. बी. तनपुरे, वैभव नाईकरे, विक्रम भुजबळ, प्रा. बापूसाहेब चौधरी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.