कराटे स्पर्धेत दोन विद्यार्थ्यांनी पटकाविले कांस्यपदक
अमळनेर-येथील अॅड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल च्या विद्यार्थ्यांनी ओकानोवा मार्शल आर्टस ऑफ इंडिया सोलापूर यांच्या वतीने आयोजित कराटे स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. यामधे प्रशांत बाळु तिलंगे व पवन प्रविण लोहार यांनी चांगली लढत देऊन कास्यपदक पटकावले. यासह खो-खो स्पर्धेत आदित्य काळे, निखिल धोत्रे, हर्षल पाटील, हर्षित बारसे, मेहुल निकुंभ, मयुर बोरसे, रोहित दिसले, केतन चौधरी, मनिष पाटील यांनी सहभाग नोंदविला व चांगली लढत दिल्याबद्दल सी.बी.एस.ई.च्या वतीने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील, सचिव प्रा. श्याम पाटील, संचालक पराग पाटील, देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्रशासन अधिकारी अमोल माळी, क्रीडा शिक्षक व्हि. एन सुर्यवंशी, केदार देशमुख यांनी अभिनंदन केले.