अ‍ॅन्युअल स्पोटर्स डे व नाताळ उत्साह साजरा

0

चाळीसगाव : अ‍ॅन्युअल स्पोटर्स डे उमंग सृष्टी प्री-प्रायमरी स्कूल मध्ये साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संपदा उन्मेश पाटील ह्या होत्या तसेच कार्यक्रमचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उन्मेश पाटील, डॉ. शुभांगी पूर्णपात्रे, डॉ. ज्योती पाटील,साधना पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उमंग सृष्टी प्री-प्रायमरी स्कूल मधील चिमुकल्यांनी वेलकम करून केली. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून केले मान्यवरांनी डॉ. शुभांगी पाणी मशाल प्रज्वलित करून स्पोटर्स डेचे ध्वजारोहण केले. प्रमुख पाहुणे डॉ. शुभांगी पूर्णपात्रे यांचे स्वागत संपदा पाटील यांनी केले. तसेच आमदार उन्मेश पाटील यांचे स्वागत शेख यांनी केले. संपदा यांचे स्वागत साधना पाटील यांनी केले.

मुलांच्या विकासात खेळ महत्त्वाचे
डॉ.शुभांगी पूर्णपात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी मुलांच्या जीवनात खेळाचे महत्व कसे असते आणि मुलांच्या विकासासाठी त किती महत्व पूर्ण असते ते समजावून सांगितले. त्याच बरोबर पालकांच्या पालकांच्या भूमिका कश्या असल्या पाहिजे पालकांनी त्यासाठी कशा पद्धतीने जागृत असले पाहिजे व पालकांना आपले आरोग्य कसे टिकवले पाहिजे सुदृढ असले पाहिजे याचे महत्व आपल्या मनोगतातून समजावून सांगितले.

पालकांनीही घेतला खेळामध्ये सहभाग
आमदार उन्मेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनीही मुलांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी दैनंदिन जीवनात खेळाचे महत्व आहे हे अर्वजवून सांगितले मुलांमधील उर्जेचे रुपांतर जर आपण खेळा मध्ये केले तर त्यातून आपण देशाला चांगले खेळाडू देऊ शकतो असे मनोगत व्यक्त केले. क्रीडा महोत्सवात मुलांचे संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बेडूक उडी, धावणे, बॉल इन, बकेट, क्लेपिंग या स्पर्धा घेण्यात आल्या. पालकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व खेळा मध्ये सहभाग घेतला.

प्रशस्तीपत्रक देवून गौरव
स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांनी आमदार उन्मेश पाटील, डॉ. शुभांगी पूर्णपात्रे, संपदा पाटील,डॉ.ज्योती पाटील यांनी प्रशस्ती पत्रक देऊन गौरव केला. विद्यार्थ्यांना नाताळच्या आनंद उपभोगला. कार्यक्रमास उपस्थित साधना पाटील, कु.जीनल शहा, वृषाली पाटील, कु. भाग्यश्री व्यास, कु. वैष्णवी पवार, हेमांगी पाटील,कुसुम राजपाल, शेख सर, सुहास पवार, अर्जुन पाटील, मयूर मगर, मनोहर सोनवणे, उल्हास पाटील, भगवान आदींनी यशस्वीतेसाठी कामकाज पाहिले.