भुसावळ । तालुक्यातील गोजोरे येथे अॅपेरिक्षा व चारचाकी वाहनाची धडक होवून 10 आशासेविका जखमी झाल्या आहेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जखमींना केले रुग्णालयात दाखल
आशा सेविका त्यांच्या प्रशिक्षणासाठी अॅपेरिक्षाने गोजोरे मार्गे किन्ही येथे जात असतांना सकाळी 10 ते 10.30 च्या सुमारास गोजेरे येथे मलकापूर येथील पंडितराव देशमूख यांच्या कारने धडक दिली. या धडकेत वराडसीम येथील मंगला कैलास सपकाळे, जयश्री भोगे, मनिषा राणे, शैला धनगर तसेच जिजाबाई ठाकरे(जोखलखेडा), ज्योती अमृत पाटील(सुनसागव), प्रतिभा पाटील(गोंभी), रेखा कोळी व कविता डोळे दोन्ही रा.गोजोरे यांना दुखापत झाली. यात मनिषा सपकाळे, जयश्री भोगे, मनिषा राणे, जिजाबाई ठाकरे यांना गंभीर दुखापत झाली असून अन्य महिलांना जोरदार मुक्कामार लागला आहे. रिक्षाचालक खलील याला देखील दुखापत झाली. आशा सेविकांना उपचारासाठी शासकिय रुग्णवाहिकेव्दारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. कार चालक मलकापूर येथील पंडितराव देशमूख यांच्या गुढग्याला व कमरेला दुखापत झाली असून त्यांना देखील जिल्हा रुग्णालयात आणले होते.