आंचलवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण

0

अमळनेर। शासनाच्या ग्रामविकास कार्यक्रमांतर्गत आंचलवाडी येथे निर्माण झालेल्या अत्याधुनिक ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार चौधरी यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले असून याच पद्धतीने तालुक्यातील 19 ग्रामपंचायतच्या इमारती अत्याधुनिक होणार आहे. आंचलवाडी ग्रामपंचायत कार्यालयासाठी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता.

याप्रसंगी सरपंच युरोपाबाई मुरलीधर पाटील, रणाइचे सरपंच प्यारेलाल भिल, रावसाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, गोपाल पाटील, किरण गोसावी, नरेंद्र चौधरी, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, सुनील भामरे, पंकज चौधरी, सुरेश पाटील, राजू भाऊ पाटील, पुरुषोत्तम चौधरी, योगेश पाटील, संजय पाटील, शिवाजी भिल, बापू पाटील, ताराचंद भिल, भगवान पाटील,आर एन पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.