राजगुरुनगर । हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋग्वेद काळे याने प्रथम क्रमांक पटकविला. तसेच एस.आय.टी. महाविद्यालयातील श्वेता भामरे व विवेक चित्ते यांनी सांघिक विजेतेपदाचा चषक व 5000 रुपयांचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेचे हे 28 वे वर्ष आहे. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कक्षेतील एकूण 22 महाविद्यालयातील 40 विद्यार्थी सहभागी झाले. शेतकरी संप : हित आणि फलित, विनोदी साहित्यिक – पु. ल. देशपांडे, ना. श्री. शरदरावजी पवार-एक राजकीय प्रवास, तरुणाई आणि मोबाईलचा अतिवापर असे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते.
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण
बक्षीसाचे वितरण नानासाहेब टाकळकर, सुशील शिंगवी, अंकुश कोळेकर, आनंदराव काळे, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डॉ. एच. एम. जरे, प्रा. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे यांचे हस्ते झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. संदीप सांगळे, भोरच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. साईनाथ पाचारणे व पत्रकार किरण खुडे यांनी काम पाहिले.
स्वातंत्र्य जपा
स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी दररोज जवान शहीद होत आहेत. स्वातंत्र्याचे मूल्य लक्षात घेऊन त्याची जपवणूक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरु डॉ. पंडितराव पलांडे, नानासाहेब टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, अंकुश कोळेकर, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील याप्रसंगी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेते
द्वितीय क्रमांक निकिता पाटील हिने पटकावला असून तिला 5000 रुपये व करंडक, तृतीय क्रमांक रत्नाई महिला महाविद्यालय अंकिता शिंदे हीला मिळला असून तिला 3000 रुपये व करंडक देऊन सन्मानित करण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिस काजल पोखरकर, आदित्य जवळकर, शुभम गाडगे, शशिकांत राऊत, पंकज पाटील, अशोक शिंदे, रुपाली गिरवले, गोविंदा राठोड, निखील नगरकर, शुभम गव्हाणे यांना देण्यात आले.