आंतरराज्यीय घरफोडे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

दिल्लीला विमानाने पळून जाण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या

धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दोंडाईचा शहरातील घरफोडी प्रकरणी आंतरराज्यीय दोन घरफोड्यांना अटक केली आहे. जीमी विपीन शर्मा (नंदुरबार) व शाहरूख रफिक शाह फकिर (शाहदुल्ला नगर, पटेलवाडी, नंदुरबार) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींविरोधात तब्बल 23 चोरीसह घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या शिवाय राजस्थानसह गुजरात व हरीयाणा राज्यातही गुन्हे दाखल आहेत. आरोपींच्या ताब्यातून 22 हजारांची रोकड, 80 हजारांची दुचाकी व एक लाख 14 हजार 200 रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, रफिक पठाण, प्रकाश सोनार, संदीप सरग, राहुल सानप, गौतम सपकाळे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, अमोल जधव आदींच्या पथकाने आदींच्या पथकाने केली.