भुसावळ : एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय बांभोरी येथे ग्लोबल ट्रेन्ड इन सिग्नल प्रोसेसिंग इन्फरमेशन कॉम्पुटींग अॅन्ड कम्युनिकेशन (आयसीएसपीआयसीसी) ही आंतरराष्ट्रीय परिषद 22 ते 24 डिसेंबर या तिन दिवसात आयोजित करण्यात आली होती.
यात पुणे येथील अभियंता जितेश नेवे यांना ‘बेस्ट पेपर अवार्ड’ देवून सन्मानीत करण्यात आले. जितेश नेवे यांनी कॉम्प्युटर सायन्स या विषयात शोध निबंध सादर केला. या परिषदमध्ये देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले शोध निंबध सादर केले होते. त्यात जितेश नेवे यांचा पेपर प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आला. ते चोपडा येथील प्रगतशिल शेतकरी व उद्योजक राजेंद्र नेवे यांचे चिरंजीव आहे. त्यांना महाविद्यालयातील राहुल गायकवाड यांचे
मार्गदर्शन लाभले.