मुंबई | जगाच्या पाठीवर सर्वत्र भारताचे नाव उंचावण्यात भारतीय विद्यार्थी कधीही कमी पडत नाहीत. ही किमया नुकतीच केली आहे अद्वैत गणपती या पुण्यातील १६ वर्षीय विद्यार्थ्याने. फ्रान्समधील नाइस येथे २२ ते २९ ऑगस्ट दरम्यान होणा-या आंतरराष्ट्रीय भूविज्ञान ऑलिम्पियाड अर्थात आयईएसओमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांमध्ये अद्वैतचा समावेश आहे. हा असामान्य बुद्धीचा विद्यार्थी वयाच्या चौदाव्या वर्षापासून पुण्यातील अघारकर संशोधन संस्थेत प्रशिक्षण घेतो आहे. देहराडूनच्या डून स्कूलमधून शिक्षण घेतलेला अद्वैत त्याच्या तयारीचे श्रेय टॉपर या भारतातील सर्वाधिक अद्ययावत आणि सर्वसमावेशक ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला देतो. बोर्डाच्या परीक्षा, ऑलिम्पियाड आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणा-या विद्यार्थ्यांना टॉपर अध्ययन सुविधा पुरवते.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अद्वैत गणपती म्हणाला, “हे शिबिर म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे यश ठरले. या ऑलिम्पियाडबद्दल माहिती मला इंटरनेटवरून कळली आणि मी स्वत:ला या स्तरापर्यंत आणून ठेवले आहे. टॉपरने पुरवलेल्या अभ्याससाहित्याशिवाय तसेच ऑनलाइन मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. यामुळे मला तयारी करणे खूप सोपे गेले. भूविज्ञानात अनेक शाखांचा समावेश असल्याने मला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित या सर्व विषयांचा संयुक्तपणे अभ्यास करता आला आणि या सर्व विषयांचे एकत्रित उपयोजनही करण्यात आले. आता माझे ध्येय आहे ते या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्याचे.”
अद्वैतच्या आयईएसओसाठी झालेल्याव निवडीबद्दल टॉपर डॉटकॉमचे उपाध्यक्ष (एज्युकेशनल कंटेण्ट) श्री. राजशेखर रात्रेय म्हणाले, “हा आपल्या देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. अद्वैतने एका कठीण स्पर्धेत स्वत:ला सिद्ध करून त्याच्या वयाच्या विद्यार्थ्यांपुढे एक उदाहरण ठेवले आहे. आमच्या साहित्याची त्याला तयारीत मदत झाली याचा आनंद वाटतो. शिबिरात शिकवलेली काही गुंतागुंतीची भूवैज्ञानिक तत्त्वे आमच्या व्हिडिओ लेक्चर्समधून त्याला समजावून घेता आली. ऑलिम्पिकसाठी तयारी करताना शाळेचा अभ्यासही सांभाळण्यासाठी त्याला आमच्याकडे उपलब्ध साहित्याचा उपयोग झाला. अद्वैतच्या यशाबद्दल आम्हाला आनंद आहे आणि त्याला भविष्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत.”
वेगवेगळ्या देशांतील तरुण विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीचे नाते तयार व्हावे तसेच भूविज्ञान क्षेत्रातील कल्पना, साहित्य आणि शिक्षणात आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य व आदानप्रदान व्हावे हा आयईएसओमागील उद्दिष्ट आहे. भारतातून ऑलिम्पियाडसाठी संघ निवडण्याची जबाबदारी भारतीय भूगर्भशास्त्र संस्थेवर आहे. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला चार टप्पे सर करावे लागतात. यात राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा असते. याशिवाय एक प्रशिक्षण शिबिर असते. या शिबिरातूनच पुढे राष्ट्रीय स्तरावरील भूविज्ञान ऑलिम्पियाड घेतली जाते. तिस-या टप्प्यात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडला जाण्यापूर्वी एक प्रशिक्षण शिबिर असते. चौथा व अंतिम टप्पा म्हणजे आंतरराष्ट्रीय भूविज्ञान ऑलिम्पियाड.