अक्कलकुवा । तालुक्यातील खापर येथील संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळाच्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उल्हासात साजरा करण्यात आला. अक्कलकुवा तालुक्यात खापरसह जि. प. अक्कलकुवा शाळा नंबर 1,2 व3, कन्या शाळा, आदर्श महाविद्यालय, जि.प.गलोठा,न्यू इंग्लिश स्कूल,सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय , वर्धमान पब्लिक स्कूल अक्कलकुवा शाळा व पतंजली योग समिती अक्कलकुवा यांचा संयुक्त विद्यमाने योग दिवस साजरा करण्यात आला. याठिकाणी योग शिक्षक निवृत्त प्रा.के.जी. राजपूत, चंद्रकांत चव्हाण, वर्धमान पब्लिक स्कूलचे प्राचार्य रवींद्र गुरव, नितेश शिंदे, प्रा.सुदेश सूर्यवंशी यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक कारून दाखविले.
ध्यान व प्राणायाम सादर करून प्रशिक्षण
खापर येथे माध्यमिक विद्यालय कोराई तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय खापर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या प्रांगणात योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच सर्व कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला. कनिष्ठ महाविद्यालायचे प्राध्यापक व योग शिक्षक प्रा.संग्रामसिंग राजपूत, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.डि. टी. सूर्यवंशी, कोराई विद्यालयाचे सुरेंद्र माळी व धनराज शिंदे यांनी विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्या समोर विविध योगासने,ध्यान व प्राणायाम सादर करून प्रशिक्षण दिले.शिबीराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. एस. भोळे यांनी केले. कार्यालयीन अधीक्षक बी.सी.महाले अध्यक्षस्थानी होते. योग शिबिर यशस्वी होण्यासाठी माजी प्राचार्य डॉ.बी.एस.पाटील सर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख एस.पी.बैसाने सर तसेच सर्व कर्मचार्यांची कामकाज पाहिले.