जळगाव। नुकत्याच झालेल्या पोलिस शिपाई भरतीत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या जिल्हा क्रीडा प्रशिक्षण शिबिरातील सॉफ्ट बॉलचा आंतरराष्ट्रीय खेळांडू मेरिटमध्ये पास होवून पात्र झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे हस्ते जयेश मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. प्रदिप तळवेलकर, विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, डॉ. सतिष देवकर, प्रितिश पाटील, सुमेध तळवेलकर अध्यक्ष येवले हे आंतरराष्ट्रीय सॉफ्ट बॉल खेळाडू तनेय राष्ट्रीय खेळाडू अरुण श्रीखंडे, सचिन जगताप, अनिल माकडे उपस्थित होते.