रेवाडी (हरियाणा) । भारतीय महिला हॉकी संघातील प्रमुख खेळाडू आणि भविष्यातील स्टारम्हणून ओळखल्या जाणार्या ज्योती गुप्ताचा संशायास्पद मृत्यू झाला आहे. सोनीपतमधून रोहतकला जाण्यासाठी निघालेल्या ज्योतीचा मृतदेह हरियाणातील रेवाडी येथील रेल्वेरुळावर सापडला.
ज्योतीच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ज्योती रेवाडीला कशी पोहचली याची चौकशी सुरू आहे. रोहतक रेल्वेमार्गावर असलेल्या फ्लायओव्हर ब्रीजजवळ एका युवतीचा मृतदेह असल्याची सूचना रेल्वे पोलिसांना मिळाली. मृतदेहजवळ सापडलेल्या पर्स आणि मोबाइलच्या आधारावर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले. रात्री उशिरा संबिंंधत युवतीच्या मोबाइलवर घरच्यांचा फोन आल्यावर ती युवती ज्योती गुप्ता असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडून माहिती मिळाल्यावर ज्योतीचे वडील प्रमोद गुप्ता, आई बबली गुप्ता, तिचे मार्गदर्शक अनिलकुमार यांनी रेवाडीमध्ये येऊन मृतदेहाचा ताबा घेतला.